ताउक्ते चक्रीवादळ नुकसानीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी नुकसानिबाबाद संवाद साधला.

रत्नागिरी येथे ताउक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

निसर्ग चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ महिन्यानंतर मदत पाठविली होती. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकर मदत पाठवावी.

तौक्ते वादळ दुर्घटनेतील दिनेश गजानन जोशी आणि राजाराम कृष्णा कदम यांच्या वारसाना प्रत्येकी 4 लाखाचा धनादेश मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला .

तौक्ते चक्रीवादळाची भीषणता पाहता देवबागसारखी अनेक गावे भविष्यात सागरी अतिक्रमणाच्या तडाख्यात सापडून उद्धस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाडीकिनारी आणि समुद्रकिनारी योग्यप्रतीचे बंधारे होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

देवबागमध्ये अद्ययावत सक्षम बंधारा नाही झाला, तर भविष्यात देवबाग गाव उद्ध्वस्त होण्याचा धोका असून यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान मोठे झाले आहे. पंचनामे वेगाने होत असून घरांचे पंचनामे जवळपास संपत आले आहे.
शेतीचे आणि फळबागांचे पंचनामे सुद्धा पूर्ण होत आले आहे .
कोकणवासियांना भरीव मदत केली जाईल.
कोणालाही नाराज न करता सढळ हाताने मदत महाविकास आघाडी सरकार करणार आहे.
नुकसानभरपाई प्रत्येक नुकसानग्रस्ताला मिळाली पाहिजे.
पंचनामे करताना कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावना , त्यांचे दुःख याची जाणीव ठेवून काम करावे .
देवबाग तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे ताउक्ते चक्रीवादळ नुकसानीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी आज संवाद साधत आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेस, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक सहकारी सोबत आहे .
रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज बहुतांश गावांना भेट दिली. फळबागांचे नुकसान, गरीब कुटुंबांच्या घरांचे नुकसान जागोजागी दिसत आहे.
स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेगाने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे, पंचनामे पूर्ण होताच तत्काळ मदत नुकसानग्रस्तांना उपलब्ध होईल.
कोकणी माणसाला महाविकास आघाडी सरकारने कधीचं अंतर दिले नाही आणि वाऱ्यावरही सोडले नाही.
मागच्या वर्षी निकष बदलून मदत केली. फळबागा, घरांचं नुकसान झाल होत त्यांना सगळ्यांना मदत केली.
परंतु त्यावेळेस पोल्ट्री व्यवसाय यातून सुटला होता, परंतु यावेळेस पोल्ट्रीचाही समावेश या नुकसानीमध्ये करण्याचे ठरवले आहे.
म्हसळा तालुक्यातील चाफेवाडी आणि श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल कोळीवाडा येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
“ताउक्ते” चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात खूपच नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करून शासनास तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश आज श्रीवर्धन येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले.
प्रशासनातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेच्या तक्रारींची नोंद घेऊन नुकसान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत मिळायलाच हवी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
विशेषतः तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांनी आपले काम चोख करावे. शासन स्तरावरून आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत पुनर्वसन च्या दृष्टीने अनेक आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत. राज्य शासनाकडून वीजप्रतिरोधकयंत्र बसविणे, भूमिगत वीजवाहिन्या टाकणे यासारखी कामे लवकरच सुरू होतील. याशिवाय पोल्ट्रीधारकांचाही प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावला जाईल.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ताउक्ते चक्रीवादळ नुकसानीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी नुकसानिबाबाद संवाद साधला.