ससून रुग्णालय हे रुग्ण सेवेसाठी आहे की गुन्हेगार सेवेसाठी ?

ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा!
राज्यात एकीकडे रुग्णालयात मृत्यू संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे पुण्यातील ससून रुग्णालय गुन्हेगारांचे अड्डे झाले आहे.
पालकमंत्री पद कुणाला मिळणार या भांडणात पुण्यातील रुग्णालयांमध्ये गुन्हेगारांना आपला अड्डा चालवायला मिळाला आहे.
ससून रुग्णालयात राहून अमली पदार्थाचे रॅकेट चालवणारा आरोपी ललित पाटील प्रकरण समोर आले होते.
त्यानंतर ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. ललित पाटील फरार झाला की त्याला पळून जायला कुणी मदत केली होती हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
सदर प्रकरणात पोलिसांवर केलेली कारवाई अपुरी असून येरवडा तुरुंगातील प्रशासकीय अधिकारी, ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे संगनमत असल्याशिवाय हे होणारच नाही. त्यामुळे या प्रकरणाची SIT चौकशी होणे गरजेचे आहे.
सदर प्रकरणाकडे राज्याचे गृहमंत्र्यांचे लक्ष आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी पुण्याचे पालकमंत्री कोण, उपपालकमंत्री कोण या प्रकरणात न पडता कायदा व सुव्यवस्था प्रश्नांशी सबंधित विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि तातडीने SIT नेमून चौकशी करावी.
पुण्याच्या ससून रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील नऊ आरोपी सरकारी पाहुणचार झोडत आहेत.
राज्यभरात कल्याण मुंबई मटका चालवणारा मटका किंग हा उपचाराच्या नावाखाली 274 दिवसांपासून ससून रुग्णालयात दाखल आहे.
अश्याच गंभीर गुन्ह्यातील आणखी ८ आरोपी ससूनच्या कैदी वॅार्डमध्ये सरकारी पाहुणचार झोडत आहेत.