गडचिरोली येथे महाज्योतीतर्फे नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

गडचिरोली येथे महाज्योतीतर्फे नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाटकाचे उद्घाटन करून सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत समाजिक विचारांचा प्रसार व्हावा आणि त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल जनतेला कळावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला असता ते त्यावेळी सादर होऊ देण्यात आले नाही. त्यानंतर प्रथमच महाज्योतीच्या प्रयत्नांनी हे नाटक सादर केले जात आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा काळ आणि तेव्हाचे समाजमन लक्षात घेता नाटकातून होणाऱ्या प्रबोधनाला महत्त्व होते. वैचारिक व सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रबोधनाची कास धरत समाजाच्या अंतर्मनात पोहोचण्यासाठी त्यांनी तृतीय रत्न हे नाटक बांधले. याच नाटकाने सामाजिक रंगभूमीचा पाया रचला. महात्मा फुले यांची वैचारिक दृष्टी या नाटकात कलात्मकदृष्ट्या व्यक्त होते. कलेचा कृतिपूर्ण उद्देश या नाटकातून दिसून येतो.
महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात ‘तृतीय रत्न’ नाटकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला याचा आनंद आहे.