भारतीय संविधानाप्रती कटीबध्द असणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थी मित्रांना संबोधित केले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भारतीय संविधानाप्रती कटीबध्द असणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. संविधानाचे वाचन करून सर्वांनी आपले हक्क व जबाबदारी जाणून घेणे आवश्यक आहे. संविधानाचे जागर करण्यासाठी सर्वांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे आवाहन मी सर्वांना करतो.
भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ भारताचा संविधान असून संविधानामुळेच देशाचे अखंडत्व टिकून आहे.
स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणा विरुद्ध आवाज उचलण्याचा हक्क हे संविधानाने नागरिकांना बहाल केले आहेत.