संघर्षशील नेता विजय वडेट्टीवार

संघर्षशील मजबूत विरोधीपक्ष नेता

देशातील राजकीय वर्तमान विद्वेषी, एकसुरी,वैरभाव जोपासणारे आणि विरोधकांचा उपमर्द करणारे असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळात राजकीय सामंजस्याचे जे दर्शन घडले, ते एकूणच राज्याच्या आजवरच्या सुसंस्कृत परंपरेला साजेसे,किंबहुना ही परंपरा आणखी पुढे नेणारे आहे.
विजय वडेट्टीवारांना मिळालेले विरोधीपक्षनेते पद औट घटकेपुरते होते  तरी त्यांना ते देताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटुता आली नाही.या दोन्ही पक्षाच्या निवडीचे काही नियम,संकेत असतात आणि ते पाळले जाणे क्रमप्राप्त असते.मात्र,हल्ली एकमेकांची कोंडी करण्याच्या हेतूने त्यातून चोरवाटा शोधून अशा निवडी होऊ न देण्याचा प्रघात पडलेला आहे.१९६१च्या पावसाळी अधिवेशनात ‘तुमच्या सरकारचे मार्गदर्शक कोण?’असा सवाल एका जेष्ठ सदस्याने सरकारला दिलेले उत्तम मोठे मार्मिक आणि दिशादर्शक आहे.ते म्हणाले होते की,’जनतेने निवडून दिले पण संख्याबळाअभावी विरोधी बाकावर असलेले सन्मानित सदस्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हेच सरकारचे खरे मार्गदर्शक आहेत!’सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये असलेला विरोधकांबद्दल असा आदरभाव हल्ली दुर्मिळ झाल्याचे दिसते.असो राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात कोलांटउडी मारल्यामुळे विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेते म्हणून निवड झाली.
अपघाताने या अपरिहार्य कारणांस्तव वडेट्टीवारांना हे पद मिळाले असले तरी या पदाचे खरे दावेदार तेच होते.काँग्रेस पक्षाने त्यांना हे पद पूर्वीच द्यायला हवे होते.विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेल्या वडेट्टीवारांचा मूळ पिंडच लढवय्या आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीसारखया आडवाटेवर असलेल्या मतदारसंघातून ते निवडून आलेले असले तरी,त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष खूप मोठा आहे.आदिवासी उपेक्षित आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी ते सतत लढत आलेले आहेत.याच घटकांच्या बळावर त्यांनी ३८ वर्षे प्रस्तापिकांच्या ताब्यात असलेला मतदारसंघ जिंकून घेतला आहे.खरे तर काँग्रेस पक्षाने विजय वडेट्टीवार सारख्या लढवय्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड करायला हवी होती.कणखर नेतृत्वाअभावी विदर्भात जवळपास संपुष्टात आलेल्या काँग्रेस संघटनेला वडेट्टीवारांमुळे संजीवनी मिळाली .

विजयी नेतृत्व करणारा नेता 

२०१४ – २०१९ पाच वर्षात राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत असतांना अतिशय संयमीरित्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडीत चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात काँग्रेसला जीवंत ठेवण्यात वडेट्टीवार यांनी परिश्रम घेतले होते. राज्यात काँग्रेसमधीलच बडे नेते भाजपाच्या वाटेवर असतांना  पाच वर्षापासून  कोमात गेलेल्या काँग्रेसला संजवणी मिळवून देण्यात वडेट्टीवार यशस्वी ठरले आहेत.

विजय वडेट्टीवार यांची यशस्वी राजकीय कारर्कीद-

१९९६ – मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष

१९९८ ते २००४ – विधान परिषदेचे सदस्य.

२००४ ते २००९ – आमदार चिमूर विधानसभा

२००८ ते २००९ – राज्यमंत्री, जलसंपदा, आदिवासी विकास, पर्यावरण वने

२००९ ते २०१४ – आमदार चिमूर विधानसभा

२००९ ते २०१० – राज्यमंत्री , जलसंपदा, उर्जा, वित्त व नियोजन सांसदीय कार्य

२०१४ ते २०१९ – आमदार ब्रम्हपुरी विधानसभ क्षेत्र तथा उपगटनेता काँग्रेस विधीमंडळ

२०१९ ऑक्टोंबर – गटनेता विधीमंडळ काँग्रेस तथा विरोधीपक्ष नेता

२०१९ – ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा आमदार व मंत्री

२०२० – बहुजन विकास , मदत व पुनर्वसन , आपत्ती व्यवस्थापन मंत्री