संघर्षशील नेत्याची निवड

अपरिहार्य कारणांस्तव वडेट्टीवारांना हे पद मिळाले असले तरी या पदाचे खरे दावेदार तेच होते.काँग्रेस पक्षाने त्यांना हे पद पूर्वीच द्यायला हवे होते.विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेल्या वडेट्टीवारांचा मूळ पिंडच लढवय्या आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीसारखया आडवाटेवर असलेल्या मतदारसंघातून ते निवडून आलेले असले तरी,त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष खूप मोठा आहे.आदिवासी उपेक्षित आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी ते सतत लढत आलेले आहेत.याच घटकांच्या बळावर त्यांनी ३८ वर्षे प्रस्तापिकांच्या ताब्यात असलेला मतदारसंघ जिंकून घेतला आहे.खरे तर काँग्रेस पक्षाने विजय वडेट्टीवार सारख्या लढवय्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड करायला हवी होती.कणखर नेतृत्वाअभावी विदर्भात जवळपास संपुष्टात आलेल्या काँग्रेस संघटनेला वडेट्टीवारांमुळे संजीवनी मिळाली आहे.