वन अकादमी कोविड केअर सेंटर चंद्रपूर येथे 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वित

वन अकादमी कोविड केअर सेंटर चंद्रपूर येथे 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्यात येत आहे.
काल त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, काम ठराविक वेळेत पूर्ण होत आहे.आतापर्यंत 4800 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा आधार ठरलेले चंद्रपूर वन अकादमी येथील कोविड केअर सेंटर .
येथील डॉक्टर्स,नर्सेस,सफाई कर्मचारी यांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केल्याने आता पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोना ची लागण झालेली नाही. नागरिकांनी सुद्धा या त्रिसूत्री चे पालन करावे.