गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासोबत पाहणी दौरा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माझे मित्र नानाभाऊ पटोले यांच्यासोबत
काल गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा करतांना अनेक गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी धावती भेट घेतली. ज्यामध्ये धारगाव, चामोर्शी, फराळा यांचे प्रामुख्याने समावेश आहे.
पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान केले असल्याचे हे जिवंत दृश्य आहे. आज गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर मी व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी प्रत्यक्ष भेट दिली. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातही खरीप पिकावर शेतकऱ्यांचा संसार अवलंबून आहे. धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा संसार कोलमडले असल्याची स्थिती स्पष्टपणे दिसत आहे.
फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशे २ मंत्र्यांचे कॅबिनेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे कधी लक्ष देणार ?
गडचिरोली जिल्ह्यातील शिवनी गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतींची पाहणी करून शेतकऱ्यांची वचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थकि मदत राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले , शेतपिकांना फटका बसला, गरीब कुटुंबांच्या घरे- दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाकडून घेतला.
अतिवृष्टीने राज्यातील १० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात २५ हजार हेक्टर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील नागरिकांचा संसार खरिपाच्या धानावर अवलंबून आहे. मात्र पीक गेल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने तातडीने दिलासादायक मदत देण्याची गरज आहे.
बैठकीला जिल्हाधिकारी श्री.संजय मीना,, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटाराम तलांडी, डॉ.नामदेव किरसान, संदीप गड्डमवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते, जेसा मोटवाणी आदी उपस्थित होते.