संविधान, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा मैलाचा दगड ठरत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगावच्या निगुर्णा नदीच्या पात्रात भव्य जाहीर सभा घेऊन स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे भाषण तेथे केले होते. त्यावेळी त्यांनी वाडेगावला बार्डोली ऑफ बेरार असे संबोधून वाडेगाववासियांचा सन्मान केला होता. ज्या गावात महात्मा गांधी यांनी सभा घेतली होती त्याच गावातून ८९ वर्षानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा पुढे गेली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच देशाचे संविधान धोक्यात आले आहे.भारतीय जनता पक्ष दररोज संविधानावर हल्ला करत आहे. दलित, आदिवासी आणि गरिबांना त्यांचे हक्क मिळावेत हे भाजपला मुळीच मान्य नाही.
संविधान, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा मैलाचा दगड ठरत आहे. यात्रेमुळे देशातील महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेमध्ये जागरूकता निर्माण होत आहे.