कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्‍तांना रु. 141,64,21,000/- निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी 31 मार्चपूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेऊन राज्य कार्यकारी समितीने 27 एप्रिल रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना रु. 141,64,21,000/- (रुपये एकशे एकेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकवीस हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यामध्ये विभागीय आयुक्त कोकणसाठी 7319.97 लाख रुपये, विभागीय आयुक्त पुणेसाठी 5573.85 लाख रुपये, विभागीय आयुक्त नाशिकसाठी 245. 20 लाख रुपये आणि विभागीय आयुक्त औरंगाबादसाठी 1025 .19 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

/ In निर्णय ठाम ... लोकहिताचे काम / By admin / Comments Off on कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्‍तांना रु. 141,64,21,000/- निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.