विजय वडेट्टीवार मित्र परिवाराकडून दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतीचा हात .कर्करोग व अन्य आजारग्रस्तांना आर्थिक मदत.

विजय वडेट्टीवार मित्र परिवाराकडून दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतीचा हात .कर्करोग व अन्य आजारग्रस्तांना आर्थिक मदत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील येथील बेटाळा सरपंच नरेंद्र ढोंगे यांनी गावातील दोन व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याची माहिती दिली होती. काल आजारग्रस्त व्यक्तींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच आर्थिक व मानसिक आधार दिला.
हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून जीवन जगण्याऱ्या कुटुंबीयांवर दुर्धर आजाराचे मोठे संकट ओढवल्याने उपचारासाठी पैशा अभावी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पीलारे व दिघोरे कुटुंबाच्या पाठीशी मी व माझे सहकारी सदैव उभे आहोत. भेटीप्रसंगी ब्रह्मपुरी तहसीलदार उषा चौधरी, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषद गटनेता विलास विखार, बेटाळा सरपंच नरेंद्र ढोंगे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on विजय वडेट्टीवार मित्र परिवाराकडून दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतीचा हात .कर्करोग व अन्य आजारग्रस्तांना आर्थिक मदत.