प्रात्यक्षिकेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा चा लाभ देण्यात येत आहे.

प्रात्यक्षिकेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा चा लाभ देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत आज चंद्रपूर तालुक्यातील धानोरा , शिवणीचोर, म्हातारदेवी या गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे व चीचोली गावातील शेतकऱ्यांना तुर पिकाचे मोफत बियाणे वाटप केले. या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकेतील इतर निविष्ठा सुद्धा देण्यात येणार आहे .
खरीप हंगामाला पुढील आठवड्यापासून सुरवात होत आहे. यावर्षी मान्सूनही चांगला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना उच्च प्रतीचे बियाणे व खते वेळेवर मिळणे गरजेचे आहे. काही कंपन्या व वितरक नफेखोरी करण्याच्या दृष्टीने अव्वाच्या सव्वा भावात बियाणे व खतांची विक्री करून शेतक-यांची फसवणूक करतात. असे प्रकार निदर्शनास आले व उपलब्ध असलेला जुन्या खतांचा साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहे .
जिल्ह्यात खतांचा जुना साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून तो जुन्या दरानेच विक्री झाला पाहिजे. नवीन दराने विक्री केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करून गुन्हा नोंदविण्यात येईल. स्वत:च्या नफेखोरीसाठी शेतक-यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. तसेच बियाणे व खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होता कामा नये. जिल्ह्यासाठी कृषी निविष्ठांचा साठा पुरेसा असल्यामुळे कंपनी व वितरकांनी महिनानिहाय वाटप करावे. बियाणांची उगवण क्षमता कमी आढळली तर कंपन्यांना जबाबदार पकडले जाईल. त्यासाठी आतापासूनच कंपन्यांनी पर्यायी बियाणांची व्यवस्था करावी.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on प्रात्यक्षिकेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा चा लाभ देण्यात येत आहे.