ब्रम्हपुरी तालुक्यातील भोई समाजबांधवांना वैयक्तिक घरकुल बांधकाम प्रमाणपत्र वाटप .

ब्रम्हपुरी तालुक्यातील भोई समाजबांधवांना वैयक्तिक घरकुल बांधकाम प्रमाणपत्र वाटप .
मंत्री पदावर असताना राज्यात एक मोठा निर्णय घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भोई (ढिवर, एन.टी.-बी) समाजासाठी घरकुल योजना मंजूर केली होती.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध गावांतील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक घरकुल बांधकामाच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी शहरातील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात ४ आॅगस्ट रोजी गुरुवारी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला माझ्यासह तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, पं.स. गटविकास अधिकारी संजय पुरी, समाजकल्याण अधिकारी यावलकर, माजी जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्या सौ. स्मिताताई पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट यांची उपस्थिती होती.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ब्रम्हपुरी तालुक्यातील भोई समाजबांधवांना वैयक्तिक घरकुल बांधकाम प्रमाणपत्र वाटप .