राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधी सापडत नाही, नशा करणारे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मात्र सापडतात.

राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधी सापडत नाही, नशा करणारे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मात्र सापडतात.
डॉक्टरांच्या जागा रिक्त आहे, ड्रग्स विकणारे तिथे आश्रय घेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालय हे याचेच उदाहरण आहे. शासकीय रुग्णालय गुन्हेगारी अड्डा झाले आहे.
शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे काल गडचिरोलीत नवजात बाळ आणि एक कुटुंब आईला मुकलं….गडचिरोलीत महिला व बाल रुग्णालयात आठवडाभरात तीन मातांचे मृत्यू झालेत…
जनतेची कामे सोडून तीनही पक्ष एकमेकांचे रुसवे फुगवे सोडवण्याचे धंदे करत आहे.आरोग्य यंत्रणेवर दोष देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या चुका सुधाराव्या.
छत्रपती संभाजी नगर मेडिकलसाठी 26 कोटी रुपयांची मागणी असताना महायुती सरकारने 10 कोटी रुपये दिले. आमदार वाचवण्यासाठी, आमदारांना टिकवण्यासाठी 500-500 कोटी रुपये दिले, मात्र तेच पैसे आरोग्य यंत्रणेला दिले असते तर जीव वाचले असते.
घाटी रुग्णालयात 897 जागा रिक्त आहेत,2207 पैकी फक्त 1300 जागा भरल्या.सर्व जागा भरल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती.
नांदेडला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले नाही,मंत्री गेले ते पण नेहमीप्रमाणे खोटे बोलून मोकळे झाले.
यांच्याकडे आमदार खरेदी करायला खोके आहे. औषधी खरेदी करतांना निधी नसतो.
मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी आमदारांची मर्जी संपादन करण्यासाठी ५००-५०० कोटीचा निधी आमदारांना दिला. त्यातील ५० कोटी आरोग्य व्यवस्थेला दिले असते तर आज शेकडो जीव वाचवले असते… रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या नसत्या.
छत्रपती संभाजी नगर येथील घाटी शासकीय रुग्णालयातील स्थिती:
वर्ग एकच्या २८ पैकी १२ जागा रिक्त
वर्ग २ च्या २० जागा रिक्त
वर्ग ३ मध्ये ५६ जागा रिक्त
वर्ग ४ मधील ३१६ जागा रिक्त
एकूण
८९७ जागा या रुग्णालयात रिक्त आहेत
जीआर काढून सांगायचे
रुग्णांचे MRI, सिटी स्कॅन फ्री होईल.
घोषणा करायची, वाहवाह लुटायची आणि मोकळं व्हायचं.
तिकडे रुग्णालयात इन्स्ट्रुमेंट नाही, औषधसाठा नाही
सात महिन्यात सरकारने निधी का दिले नाही?
दिले असते तर शासकीय रुग्णालयात औषध तुटवडा झाला नसता.
उद्या राज्यपालांना भेटणार…
राज्यात विशेष अधिवेशन बोलवावे…राज्यातील बेजार बिमार झालेल्या आरोग्य यंत्रणेवर चर्चा करण्याची मागणी करणार .
आज शासकीय रुग्णालयात औषधी सापडत नाही, कोट्यवधी रुपयांचे नशा करणारे ड्रग्स सापडतात.
डॉक्टरांच्या जागा रिक्त आहे, ड्रग्स विकणारे तिथे आश्रय घेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालय हे याचेच उदाहरण आहे. शासकीय रुग्णालय गुन्हेगारी अड्डा झाले आहे.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधी सापडत नाही, नशा करणारे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मात्र सापडतात.