चंद्रपूर जिल्ह्यात युद्धपातळीवर उभी केली मजबूत आरोग्य यंत्रणा

  • देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलं. त्याचं लोन हळूहळू राज्यात पसरलं. सुदैवाने सुरवातीला चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त राहिला होता. मात्र, हळूहळू कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली.
  • अशावेळी योग्य निर्णय घेऊन रूग्ण संख्या कमीत कमी कशी राहील यासाठी शर्थीने प्रयत्न करून ते यशस्वी केले. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाला भेटी दिल्या.
  • डॉक्टरांसोबत कोरोनाबाधित रूग्णांच्या वॉर्ड्सना भेटी देऊन उपलब्ध आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली. केवळ भेटी दिल्या नाही तर जेवण व्यवस्थित मिळते का? औषधे दिली जातात का? काही अडचण आहे का? यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून सीसीटीव्ही सुविधा कोविड वॉर्ड मध्ये उपलब्ध करून त्याचे दृश्य कोविड मदत केंद्रात रुग्णाच्या कुटुंबाला उपलब्ध करून दिले .
  • कोरोनाबाधित रूग्णांची विचारपूस करून त्यांचे आणि तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांचे व इतर कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य उंचावले. “घाबरू नका, काळजी घ्या आणि लवकर बर व्हा ” असे म्हणत तेथील रूग्णांचे मनोबल वाढविले.
  • त्याचबरोबर डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशीही संवाद साधून स्वत:ची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.