चंद्रपूर जिल्ह्यात कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक उपाययोजना

चंद्रपूर जिल्ह्यात कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 19 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर 18 कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत आहे. 1400 बेडचे नियोजन पूर्ण झालेले असून त्यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्यात 500 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यास मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकार कडून उपलब्ध लसी साठ्यानुसार जिल्ह्यात लसीकरण सुद्धा वेगाने होत आहे .
लवकर आपला जिल्हा कोरोना मुक्त व्हावा हे ध्येय ठेवून संपूर्ण यंत्रणा काम करत आहे.