संभाव्य तिस-या लाटेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व ऑक्सीजन प्लाँटचे काम तातडीने पूर्ण करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युचा आकडा कमी झाला असला तरी संभाव्य तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संभाव्य तिस-या लाटेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व ऑक्सीजन प्लाँटचे काम तातडीने पूर्ण करण्यात येत आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व पीएसए ऑक्सीजन प्लाँट कार्यान्वित होणे आवश्यक आहे.
ऑक्सीजन रिफिलिंगकरीता ऑक्सिजन पुरवठादारांशी आतापासून नियमित संपर्क ठेवण्याचे निर्देश बैठकीत दिलेले आहे.
आजच्या घडीला जिल्ह्यात रोज दोन ते अडीच हजार टेस्टिंग होत असून पॉझेटिव्हीटी दर एक पेक्षा खाली आहे. तसेच गत 10 दिवसांपासून जिल्ह्यात एकही मृत्यु झाला नाही. ही अतिशय दिलासादायक बाब आहे. दुस-या लाटेमध्ये जिल्ह्यात 17600 रुग्ण ॲक्टीव्ह होते. शासनाच्या सुचनेनुसार यात 25 टक्के वाढ गृहीत धरून जवळपास 22000 ॲक्टीव्ह रुग्ण जिल्ह्यात राहू शकतात. त्यानुसार प्रशासनाने नियोजन केले आहे. सर्व तालुका स्तरावर डीसीएचसी करण्यात येणार असून ऑक्सीजनची पाईपलाईनसुध्दा झाली आहे. तिस-या लाटेत लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात येणार आहे.
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on संभाव्य तिस-या लाटेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व ऑक्सीजन प्लाँटचे काम तातडीने पूर्ण करण्यात येत आहे.