महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता या नात्याने जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी दिनांक ४ जुलै २०१९ ते दिनांक ६ जुलै २०१९ दरम्यान नागपूर,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून या दौऱ्यादरम्यान जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेपर्यंत जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला . 

1 जनतेला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या उत्साहाचा आज नागपुर विमानतळ येथे आगमन झाले असता अनुभव आला.पक्षपदाधिकारी,कार्यकर्ते,आप्तस्वकीय व जनतेने नागपूर विमानतळ येथे प्रचंड संख्येने उपस्थित राहत स्वागत केले.

2. विदर्भातील नागपूर,गडचिरोली व चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या दौऱ्याचा आज पहिला दिवस असून श्री.साई मंदिर नागपूर येथे साईबाबांच्या आशीर्वादाने दौऱ्याला सुरुवात केली. प्रसंगी पक्षकार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3. नागपूर जिल्हा दौऱ्याला प्रारंभ झाला असून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचे दर्शन घेतले.प्रसंगी पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात जनतेचे विविध प्रश्न मांडले आणि ते सोडवण्याबाबतीत पाठपुरावाही केला.या विषयांवर नागपूरमधील सिव्हिल लाईन परिसरातील प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला.

 

5. नागपूर जिल्हा दौऱ्यादरम्यान उमरेड रोड वरील बडा ताजबाग येथे भेट देऊन ताजुद्दीन बाबांचे दर्शन घेतले.प्रसंगी मुस्लिम बांधवांनी जल्लोषात स्वागत केले व सत्कारही केला.

6. नागपूर,गडचिरोली व चंद्रपूर दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून उमरेड येथे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.पदाधिकारी,कार्यकर्ते व जनतेला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.

7. नागभीड येथील विश्रामगृहात पक्षकार्यकर्ते,पदाधिकारी आणि जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून स्वागत केले.पक्षकार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये असलेला उत्साह आणि आनंद पक्षाला नवी भरारी देण्यासाठी अनुकूल असल्याची जाणीव झाली.

8. गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान ब्रम्हपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे भेट दिली.प्रसंगी ब्रम्हपुरी वनविभागातर्फे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमास उपस्थित राहिलो.वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा उपक्रम राबवायला हवा.