महाराष्ट्रावर निसर्गाचा कोप आणि सरकारचे मदतकार्य !

  • कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन उभे ठाकले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठे नुकसान झाले. शेकडो कुटुंबावर संकट आले असताना न थांबता प्रभावग्रस्त नऊ जिल्ह्यांना भेटी दिल्या.
  • अधिकाऱ्यांशी बैठकी घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले. जीवितहानी टाळता आली परंतु घरांचे, शेतीचे नुकसान टाळता येणे अशक्य होते .
  • पूर्वीच यंत्रणा सज्ज असल्याने नुकसानीचे पंचनामे लवकर झाले आणि यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना, शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात आली .
  • निसर्ग चक्रीवादळ नुकसाभरपाई मदत म्हणून रायगड, रत्नागिरीसाठी भरगोस निधी उपलब्ध करून दिला.
  • एनडीआरएफच्या नियमापेक्षा जास्त मदत करून निसर्ग चक्रीवादळामुळे निराधार झालेल्या कुटूंबाना एक विशेष बाब म्हणून मोफत अन्नधान्य व केरोसीन वाटप केले .