वरोरा तालुक्यातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्र खांबाडाचे उद्घाटन व लोकार्पण.

वरोरा तालुक्यातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्र खांबाडाचे उद्घाटन व लोकार्पण केले.
गावातच आरोग्य उपकेंद्र झाल्याने येथील व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना घराजवळच आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज व सुविधायुक्त इमारत उभी झाली असून सदर इमारतीमध्ये लसीकरण कक्ष, ओपीडी कक्ष, तपासणी कक्ष, अभ्यागत कक्ष उभारण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन करून त्यांची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे .