केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात नागपूर येथे आंदोलन.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत दडपशाहीचे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात नागपूर येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तपास यंत्रणांचा गैरवापर करत पक्षाध्यक्षा खा. सोनियाजी गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून विरोधकांचा आवाज दडपू पाहणाऱ्या केंद्रातील सरकार विरोधात  नागपूर येथे आंदोलन करण्यात आले.