ओबीसी कल्याणासाठी स्थापन झालेल्या राज्य शासनाच्या महाज्योती या संस्थेला आणखी १५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे .
नागपुरात मुख्यालय असलेल्या महाज्योतीसाठी आधी सरकारने ५० कोटींची तरतूद केलेली आहे. आता विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात वाढीव १५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाईल.
ओबीसींसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक १६ डिसेंबरला होणार आहे, त्यात या सूत्राबद्दल चर्चा केली जाईल.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ओबीसी कल्याणासाठी स्थापन झालेल्या राज्य शासनाच्या महाज्योती या संस्थेला आणखी १५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.