अतिवृष्टी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला दिलासा

  • वर्ष २०२० मध्ये एकामागून एक संकटांची मालिका सुरु झाली. ‘आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशी परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली. जिथे पहावे तिथे भयंकर पाऊस , रौद्र रूप धारण केलेल्या नद्या, आणि गावंच काय शहरही जलमय अशी परिस्थिती.
  • निसर्ग वादळापासून डेरेदाखल झालेले अस्मानी संकट माघार घ्यायला तयार नव्हते. मराठवाडा, विदर्भ या कायम दुष्काळी भागाबरोबरच उत्तर महाराष्ट्र, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रावरही ओल्या दुष्काळाचे संकट कोसळल्याने ‘ जा रे जा रे पावसा ‘ म्हणण्याची वेळ आली.
  • परतीचा पाऊस परतायला तयार नसल्याने हाता तोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि मदतीसाठी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट दिली.
  • लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर यासह अनेक जिल्हे पिंजून काढले. नुकसानीची पाहणी करून शेतकऱयांच्या व्यथा ऐकून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. आणि शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा दिला.
  • त्यामुळे शेतकऱयांचा हा वाली शेतकऱ्याना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास शेतकऱयांमध्ये निर्माण झाला.