जनतेला, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असा मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

जनतेला, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असा मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.
दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अश्या कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे.
जवळपास ५ लाख हेक्टर पर्यंत शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि भात पिकाचे नुकसान अधिक आहे.
१०० पेक्षा अधिक नागरिकांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला तत्काळ आधार मिळणे गरजेचे आहे. सोबतच ज्या कुटुंबांचे घराचे नुकसान, दुकानांचे , टपरी- ठेले इत्यादींचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा मदतीचा आधार मिळावा.