कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश

सावली येथे 39 ऑक्सिजन कसेटरेटर लावण्यात येणार असून आवश्यक पडल्यास ऑक्सिजन प्लांट सुध्या उभारण्यात येईल. त्यामुळे तालुक्यातील कोणताही रुग्ण ऑक्सीजन तसेच रेमडेसिविर इंजेक्शन अभावी दगावणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देत ऑक्सिजची सोय तालुक्याच्या ठिकाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जात असून पुढे ही दिले जाईल अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावली तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी विजय कोरेवारव सभापती पंचायत समिती, तहसीलदार परिक्षित पाटील, मनीषा वाजळे मुख्याधिकारी नगरपंचायत सावली, नितीन दुधावर माजी उपाध्यक्ष नगरपंचायत, स्वप्नील कावळे उपाध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केल्या जात आहे. ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण वाढत चाललेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला असून तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले असून त्यामाध्यमातून कोविड रुग्णाची तालुकास्तरावरच योग्य वेळी, योग्य उपचार तातडीने करण्यात येत आहे. असे असतांनाही काही रुग्णांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला न्यावे लागत असते मात्र येथे एकाच रुग्णवाहिका असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्वखर्चाने सावली येथे खाजगी तत्वावर चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असून रुग्णाना विनामूल्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिकाना व्हाक्सीन लसीकरणाचे काम सुरू असले तरी सुध्या 45 वर्षावरील नागरिकांना व्हाक्सीन लास देण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात यावे तसेच 1 ने पासून 18 वर्षावरील सर्वाना विनामूल्य व्हाक्सीन लास देण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले

जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी होऊ नये त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून याचे ही काम युध्द पातळीवर सुरू आहे. तसेच माझाही विभागाकडून कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे रेडमिसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लॉट यासह साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

कोविड केअर सेंटरची पाहाणी:
आज पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देत पाहणी केली व रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.
याठिकाणी 48 आयसोलेशन बेड तर दोन ऑक्सीजन बेड असे एकूण 50 बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.

/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश