ओबीसी तरुणांना महाज्योती चा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार

ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. महाज्योती कार्यान्वित करण्यात येत आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना पुणे दिल्लीत जाऊन यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आर्थिक मदत मिळू शकणार आहे. या संस्थेतर्फे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. महाज्योतीमुळे राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील एक हजार विद्यार्थ्यांना दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आर्थिक मदत यातून मिळू शकेल. उच्च शिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग, एसएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी महाज्योती निधी उपलब्ध करेल.

/ In mahajyoti / By admin / Comments Off on ओबीसी तरुणांना महाज्योती चा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार