राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रुग्णवाहिका

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याकरीता ३०.७६ कोटी रुपयांची तरतूद ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून करण्यात आली होती. या रक्कमेतून जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ५२ नव्या रुग्णवाहिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केल्या आहे .