राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला .

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला .
राज्यात जानेवारी फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष, मका, डाळिंब, भाजीपाला या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड, सातारा जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश यावेळी दिले .
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला .