ब्रम्हपुरी शहरामधून जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग उडाणपुल विकासाकरिता ७५ कोटी रुपयांच्या निधीसाठी मान्यता.

ब्रम्हपूरी तालुक्यातून जाणा-या नागपूर ब्रम्हपूरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वरील किमी ११७/४०० मध्ये ब्रम्हपूरी शहरामधून जाणा-या रेल्वे क्रासिंगवर रेल्वे उडाण पुलाचे बांधकाम करणे यासाठी अर्थसंकल्पात प्रशासकीय मान्यता- पीएलएन २०२१/सी.आर.४२४/नि-३ दिंनाक २६ फेब्रुवारी २०२१ मिळाली आहे .
सदर विकास कामाकरीता ७५ कोटी रूपये रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आले आहे .
या रेल्वे क्रॉसिंगवर उडान पुल व्हावे ही स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती .