शैक्षणिक व क्रीडा

  1. ब्रम्हपूरी शहरात खेळाडूंसाठी जलतरण केंद्र असावे ही स्थानिक नागरिकांची पुष्कळ वर्षांपासूनची मागणी होती . विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये प्रचारा दरम्यान ही मागणी पूर्ण करण्याचे वचन मी जनतेला दिले होते .
    या वचनाची पूर्तता करण्यासाठी 2 कोटी रुपये आणि उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले
  2. वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास विभाग मंत्रालय यांनी ब्रम्हपूरी नगरपरिषद परिसरात स्विमिंगपुल व उद्यानासाठी 2 कोटी 50 लक्ष रूपये.
  3. आदिवासी विकास विभागाकडून विदर्भात स्पर्धात्मक अभ्यासिकेसोबतच स्वयंरोजगार निर्मितीसाठी ट्रायबल अकॅडमीची स्थापना केली जाणार असूनत्यासाठी ५० एकर जागाआरक्षित करून प्रत्येक केंद्रासाठी ७.५ कोटीरुपयांची तरतूद केली.
  4. १० कोटी रुपयांच्या निधीतून साकार होणारा क्रीडा व युवक सेवा संचालनायल महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत स्व.दादासाहेब कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे ४०० मीटर सिंथेटिक धावनपथ (स्मार्ट ट्रॅक)बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.जिल्ह्यातील सर्वात मोठे क्रीडांगण असणाऱ्या जिल्हा क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलला निधीची कमतरता कमी पडू देणार नाही.मात्र,या सर्व सोयी सुविधांचा फायदा क्रीडापटूंना व्हावा व चंद्रपूरच्या नावलौकिकात भर पडावी, यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.
  5. ८ कोटी रुपयांच्या निधीतून ब्रम्हपुरी येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह होत आहे साकार 
  6. ब्रम्हपुरी येथे मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले. १०० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह .
  7. समाजाच्या सर्वांगीण विकासात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्र खेळाच्या क्षेत्रात सदैव अग्रेसर राहिला असून खेळाडूंना सुविधा मिळायलाच हव्या. याच भावनेतून ब्रम्हपुरी शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रम्हपुरी येथे सुसज्ज क्रीडा संकुलची उभारणी करण्यात आली.