ब्रम्हपुरी मतदारसंघातील विविध कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण सोहळा

ब्रम्हपुरी मतदारसंघातील रुई येथे वाल्मिकी सभागृहाचे भूमिपूजन काल पार पडले. यावेळी गावातील नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करून गावातील पुढील विकासकामांचे नियोजन केले.

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील मौजा पराडगाव गावातील अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज पार पडले. ५० लक्ष रुपयांच्या निधीतून हे विकासकार्य पूर्ण करण्यात येणार आहे.

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील मालडोंगरी – चौगान – जुगणाळा – मुई – गांगलवाडी – वायगाव – गोगाव – सायगाव प्रजिमा १२१ किमी रस्त्यांची सुधारणा कामाचे भूमिपूजन आज पार पडले. ६ कोटी रुपयांच्या निधीतून हे विकासकार्य पार पडत आहे.

२ कोटी रुपयांच्या निधीतून ब्रम्हपुरी येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात येत आहे. सदर विकास कामाचे भूमिपूजन आज पार पडले.

ब्रम्हपुरी नगर परिषदेकरीता स्थानिक विकास निधीतून (आमदार निधी ) उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका तसेच नवीन स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले.