कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड व्दारे चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येबाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक

कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड व्दारे चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येबाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मोकासा,चेक , बरांज,सोमनाला,बोन्थाला,कढोली,केसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ने जमिनीचे भुसंपादन केले आहे.या गावातील प्रकल्पग्रस्तांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी तसेच प्रकल्पबाधीत कुटूंबाचे सर्वेक्षण करून फेरअहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले.
केपीसीएल कंपनीने कामगारांचा २०१५ पासून ते २०२० पर्यंतचा उर्वरीत पगार त्वरीत दयावा.पुनर्वसन करारातील न्यूनतम वेतन कायदा १९४८ बाबत कामगार आयुक्तांसोबत चर्चा करून योग्य निर्णय लवकर करण्यात येईल.कुटूंबसंख्या निश्चीत झाल्यानंतर त्याची प्रसिध्दी करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले.जमिनीचे भुसंपादन पूर्ण झाल्यानंतर कराराप्रमाणे कंपनीने योग्य ती कार्यवाही करावी.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड व्दारे चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येबाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक