कोरोना संसर्ग काळात सर्व स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच स्टार्टअप सारख्या नव्या छोट्या व मोठ्या उद्योगांसाठी पतपुरवठा, जागा उपलब्धता व अनुषंगिक सुविधा पुरविण्यात याव्यात

कोरोना संसर्ग काळात केवळ मुंबई-पुणेच नाही तर, देश-विदेशातून आपापले रोजगार व आस्थापना सोडून अनेक युवक, अनेक कुटुंब आपल्या गावांकडे शहरांकडे पोहोचले आहेत. त्यामुळे रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग या घटकाशी संबंधित सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी या संधीचा फायदा घ्यावा. सर्व स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच स्टार्टअप सारख्या नव्या छोट्या व मोठ्या उद्योगांसाठी पतपुरवठा, जागा उपलब्धता व अनुषंगिक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आवाहन केले .
कोरोना संसर्ग झाल्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वेगवेगळ्या शहरांतून परत आले आहेत. यामध्ये कामगार, व्यावसायिक, उद्योजक आणि मोठ्या शहरात स्वतःचा उद्योग असणारे देखील परत आलेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी एकीकडे बेरोजगारांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देतानाच मागणीप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मकपणे पुढे यावे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज उद्योग मित्र समितीची सभा घेण्यात आली.  यापूर्वी देखील उद्योग मित्र समितीच्या बैठकी मार्फत जिल्ह्यातल्या प्रत्येक उद्योग समूहात असणाऱ्या जागा, रोजगाराची उपलब्धता, याचा आढावा घेतला होता. 

कोरोना संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग समूहांना मनुष्यबळ हवे आहे. या उद्योग समूहामध्ये मनुष्यबळ भरती करताना, स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना व अन्य ठिकाणावरून आपला रोजगार सोडून आलेल्या कुशल कामगारांना देखील संधी मिळाली पाहिजे. यासोबतच ज्यांनी आपल्या छोट्या मोठ्या उद्योगांना बंद करून पुन्हा आपले शहर गाठले आहे. परत आले, त्या सर्वांना स्थानिक स्तरावर नव्याने काही उद्योग व्यवसाय उभारायचे असल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा झाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध आस्थापनांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्थायी व अस्थायी पदांची माहिती घेतली. सोबतच वेगवेगळ्या आस्थापनांच्या बाबतची माहिती जाणून घेतली. सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या उद्योगांमध्ये किती प्रमाणात उत्पादन सुरू आहे. त्यांना किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याबाबतची आकडेवारी जिल्हा उद्योग केंद्राने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी सादरीकरण केले.