महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले.

  • महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले. महाराष्ट्राने तर कधी नव्हे अश्या ५ मोठ्या संकटांचा सामना २०२० या वर्षी केला . जागतिक कोरोना महामारी , निसर्ग चक्रीवादळ, महापूर , अतिवृष्टी, राज्यावर असलेले आर्थिक संकट असे अनेक संकटे एकामागून एक राज्यावर आली.
  • असे असले तरी याकाळात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतरमगास बहुजन कल्याण विकास मंत्री म्हणून २४ तास जनतेच्या सेवेसाठी रीचेबल राहून कार्य केले.
  • कोरोना सारखा विघातक काळ असताना जनतेच्या हितस्तव बैठका घेतल्या, त्यातून तात्काळ महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, अपत्तीग्रस्त भागांना भेटी देऊन आपत्तीग्रस्तांना मदत करून दिलासा दिला.
  • ओबीसींचा प्रश्नसाठी सातत्याने आवाज उठवला.