खेडी.तालुका सावली येथे खालील उपलब्ध जागेवर समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन

खेडी.तालुका सावली येथे खालील उपलब्ध जागेवर समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन काल पार पडले. गावातील सामान्य गरीब नागरिकांसाठी लग्न समारंभ, गावातील सामाजिक कार्यक्रमासाठी सुसज्ज व सर्व सुविधायुक्त सभागृह येथे तयार होणार आहे. 500 ते 700 नागरिकांच्या क्षमतेचे हे सभागृह असणार आहे.सभागृहाच्या बांधकामासाठी 30 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.