प्रत्येक घरात एक तरी लेक असावी, जिच्या अस्तित्वाने समृध्दी यावी!!

प्रत्येक घरात एक तरी लेक असावी,
जिच्या अस्तित्वाने समृध्दी यावी!!
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे गाव भेटी दरम्यान एक क्षण या लहान ताईंसोबत !!
‘‘आज समाजात अनेक घटना घडत आहेत. अजूनही लोकांची मुलगी नको, ही मानसिकता बदलेली नाही. लोक असे का वागतात हा प्रश्‍न पडतो. विसाव्या शतकातही स्त्रीभ्रूणहत्या होतात ही निंदनीय बाब आहे. आज मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. त्यामुळे माझ्या घरी एक मुलगी जन्माला आली याची मला खंत वाटत नाही. आपण मुलींना समान संधी दिली पाहिजे. स्त्रिया या पुरुषांपेक्षाही सरस असतात, हे त्यांनी नेहमीच सिद्ध केले आहे. शारीरिक-मानसिकरीत्या त्या ताकदवान असतात हेही तितकेच खरे आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या लीलया पेलतात. माहेर-सासरमधील दुवा म्हणजे मुलगी.