विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे…

सर्व रुग्णालयांचे ऑडिट आम्ही सुरू केले आहे. ज्या रुग्णालयांच्या तक्रारी आल्या आहेत आणि जे ऑडिटमध्ये सापडतील, त्यांच्याकडून अतिरिक्त घेतलेली रक्कम वसूल करण्यात येईल आणि रुग्णांना परत करण्यात येईल. गुजरातमध्ये कोरोना (Corona in Gujarat) रुग्णांचे आणि मृतांचे आकडे लपविले जात आहेत. मध्यप्रदेशातही (Madhya Pradesh) तीच स्थिती आहे. तिकडे मृतदेहांचा सडा पडतोय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh)एका आमदाराच्या पत्नीला रुग्णालयात भरती करून घेतले नाही म्हणून, ते आमदार अश्रू ढाळताहेत आणि विशेष म्हणजे हे आमदार भाजपचेच आहेत. हे सर्व महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांना दिसत नाही. दिसतो तो केवळ महाराष्ट्र. (Maharashtra) त्यांना महाराष्ट्राची बदनामी जेवढी करता येईल, तेवढी ते करताहेत. त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे.