डोंगा खरेदीसाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली स्व:खर्चातून 1 लाख रुपयाची मदत

ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथे मागील वर्षी महापुरात स्थानिक शेतकऱ्यांचे 3 डोंगे वाहून गेले.गावातील शेतकऱ्यांची शेती नदी च्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे शेतकऱ्यांना असुविधेसह मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते .
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची पूर्तता म्हणून आज ब्रम्हपुरी येथे त्यांना स्वखर्चातून 1 लाख रुपये मदत देण्याचे ठरवून 50,000 हजार रुपये नगद दिले.
यावेळी जि.प सदस्य सौ स्मिता ताई पारधी ,व गावातील लालाजी डोनारकर , नकटुजी मैद, अनिलभाऊ शेबे, दादाजी मिसार, मनोहर ठाकरे व इतर शेतकरी व सहकारी उपस्थित होते.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on डोंगा खरेदीसाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली स्व:खर्चातून 1 लाख रुपयाची मदत