कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा तालुक्यातील कोरोना स्थितीचा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा तालुक्यातील कोरोना स्थितीचा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.यावेळी वरोरा कोविड केअर सेंटर ला भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला .
वरोरा तालुक्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांची तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरणाबाबत माहिती घेतली. तालुक्यात लस घेणाऱ्यांची संख्या व तालुक्यात किती लससाठा उपलब्ध आहे याबाबत आढावा घेण्यात आला.
लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक केल्याने ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. त्यांच्याकरीता ऑफलाईन पद्धतीने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत आहे .
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा तालुक्यातील कोरोना स्थितीचा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.