सर्व कोविड सेंटरवर माहिती कक्ष स्थापन करून माहिती कक्षात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे.

वरोरा, भद्रावती, राजुरा,ब्रह्मपुरी व बल्लारपूर तालुक्याच्या ठिकाणी 50 आयसीयू बेड, व 50 ऑक्सिजन बेड असे एकूण 100 बेड तसेच दोन डॉक्टर्स नियुक्त करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर येथे वुमन हॉस्पिटल मध्ये 100 बेड नव्याने उभे करण्यात येत आहे .
सर्व कोविड सेंटरवर माहिती कक्ष स्थापन करून माहिती कक्षात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. रुग्णांची माहिती वेळेत मिळावी यासाठी अद्यावत पोर्टल उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे .
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे . कोरोना आपत्ती काळात खाजगी डॉक्टरांनी सुद्धा सेवा देऊन रुग्णसेवा धर्माचे पालन करावे . संकटाच्या काळात जे डॉक्टर रुग्ण सेवा देण्यास नकार देतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आरोग्य विभाग कारवाई करेल .
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सर्व कोविड सेंटरवर माहिती कक्ष स्थापन करून माहिती कक्षात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे.