रोजगार

  1. आदिवासी विकास विभागाकडून विदर्भात स्पर्धात्मक अभ्यासिकेसोबतच स्वयंरोजगार निर्मितीसाठी ट्रायबल अकॅडमीची स्थापना केली जाणार असूनत्यासाठी ५० एकर जागाआरक्षित करून प्रत्येक केंद्रासाठी ७.५ कोटीरुपयांची तरतूद केली आहे.या माध्यमातूनआदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
  2. लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर व भूमिहीन मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे.हातावर पोट असणाऱ्या घटकांना दिलासा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दीड हजारांवर कामांना मंजुरी देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर १ हजार १८९ कामे सुरू आहेत.या माध्यमातून १६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे.