माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना स्वयंचलित ट्राय सायकलचे मोफत वाटप

माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना स्वयंचलित ट्राय सायकलचे मोफत वाटप आज करण्यात आले. तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करून लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. सोबतच नागरिकांना वैयक्तिक वनहक्क पट्टे वाटप व ग्रामपंचायतींना सामुहिक वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले. यात कुंदा शंकर दडमल, शारदा प्रमोद मस्के, मुक्ताबाई मधुकर घोडमारे, शालिनी प्रकाश दडमल, मीरा दडमल, लीला मेश्राम, भास्कर मेश्राम, संगीता मडावी, सखुबाई कन्नाके यांच्यासह अनेक लाभार्थ्यांचा समावेश होता.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना स्वयंचलित ट्राय सायकलचे मोफत वाटप