कोकणाला चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना राज्य शासनाच्या इतर निधीतून 1600 कोटी देण्यात येणार.

कोकणाला चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना दरवर्षी सामोरे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर होणारे नुकसान टाळता आले पाहिजे; यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी पाच वर्षांत 3 हजार 635 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारे बांधणे, धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, वीज अटकाव यंत्रणा बसविणे या उपाययोजनांची प्राथमिकता ठरवून कामे सुरू करण्यात यावीत. आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पासाठी पाच वर्षांत सुमारे 3 हजार 635 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहेत. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 2 हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून 1600 कोटी देण्यात येणार आहेत.