राजुरा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

राजुरा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. भेटीदरम्यान राजुरा, जिवती व कोरपणा या तीन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
राजुरा विभागात सध्या 40 ऑक्सिजन बेड उपलब्ध असून 200 बेड वाढविण्याचे प्रस्तावित आहे. तसेच आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा येथे वाढवून देण्यात येईल.
तालुक्यात ऑक्सीजन सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही ऑक्सिजन बेडची संख्या कमी असल्याची बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश दिलेत.