कृषी विकास

  1. वर्ष २०२० वर्ष चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी न्याय देणारे वर्ष ठरले .
    चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सीसीआय मार्फत 4 लाख 31 हजार 885 क्विंटल कापसाची खरेदी केली तर राज्य कापूस पणन महासंघाने 2 लाख 10 हजार 137 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. थेट पणन परवानाधारकामार्फत 4 लाख 82 हजार 700 क्विंटल तसेच बाजार समिती परवानाधारक यांच्यामार्फत 19 लाख 19 हजार 503 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
  2. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये युरियाची टंचाई जाऊ नये यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत 5350 मे.टन युरीया उपलब्ध झाला आहे. इको कंपनीचे 1 हजार 500 मेट्रिक टन, तर कृभको कंपनीचे 2 हजार 500 मेट्रिक टन युरिया खत शहरात उपलब्ध झाले.
  3. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची कमतरता होवू नये यासाठी आणखी आवश्यक खत पुरवठा बाबत शेतकऱ्यांनी काळजी करू नये.
  4. कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट प्रकल्प (कृषी विभाग)
    राज्यातील कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात  राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने (IBRD) सुमारे 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये जागतिक बँकेच्या कर्जाचा हिस्सा 1470 कोटी रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 560 कोटी रुपये आणि सीएसआरमधून 70 कोटी रुपये राहणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी 7 वर्षे इतका ठरवण्यात आला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणन विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
  5. धान शेती करण्याऱ्या शेतकऱ्यांचे उत्तप्प्न वाढावे म्हणून आधुनिक पद्धती राबविल्या गेल्या पाहिजे. याकरिता विशेष प्रयत्न करून १० कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक पद्धतीने धान शेतीवर पीक घेण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
  6. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीतून सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.