डिसेंबर 2021मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे 9 हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार.

घोडाझरी हा कालवा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी

शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे.
या कालव्याच्या लाभक्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली हे तालुके येतात. यातील 19 गावात 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर 2021मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे 9 हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार.
कालव्याच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी तसेच निधी उपलब्धतेसाठी सर्वस्व सहकार्य करण्याचा शब्द यावेळी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिला .