थकलेल्या थबकलेल्या पायांना मार्गस्त करून ‘मिशन घरवापसी’ मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केली.

  • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे अनेकजण आहे त्या ठिकाणी अडकून पडले होते. अडकलेल्या मजुरांना , नागरिकांना त्यांच्या राज्यात स्वगृही सुखरूप पोहचवण्याचा , तसेच महाराष्ट्रातील नागरिक जे इतर राज्यात अडकून होते त्यांना घरवापसी करण्याचे कार्य हाती घेतले.
  • महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सरकारकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली.
  • तेलंगणाच्या सीमेवर जाऊन परिस्थिती समजून घेत तातडीने सर्व मजुरांना घरी पोहचवण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची तोडणी कामगारांना स्वगृही आणून चिंताग्रस्त कुटूंबियांना चिंतामुक्त केले.
  • तसेच राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणानिमित्त गेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली.
  • एवढ्यावर थांबले नाही तर झारखंड,बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह इतर राज्यातील नागरिकांना स्वखर्चाने तिकीट, जेवण देऊन त्यांच्या राज्यात सुखरूप पोहचवले.
  • मजुरांच्या समस्यां समजून घेऊन त्यांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली. आणि थकलेल्या थबकलेल्या पायांना मार्गस्त केले. ‘मिशन घरवापसी’ मोहीम यशस्वीरीत्या फत्ते झाली .