शेतकरी शेतमजूर यांचा पाठीराखा

  • सत्ता स्थापने पूर्वी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. पुढे मंत्री पदाची जबाबदारी मिळताच या शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली.
  • सिंदेवाही तालुक्यातील रामाळा, रत्नापूर, नवरगाव, व खैरी या भागातील शेतीला धान कापणी नंतर अती पावसामुळे नुकसान झाले, शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेअंतर्गत योग्य लाभ नाही मिळाला याची माहिती होताच त्याच्या विरोधात आवाज उठवला.
  • महाविकास आघाडी सरकारने २ लक्ष पर्यंतची विनाशर्थ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले.
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानात वाढ करून देण्याची मागणी पूर्ण केली.
  • सोयाबीन व कापसावर आधारित उद्योगांना चालना देण्याची भूमिका .
  • पालकमंत्री म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची धुरा सांभाळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीचे आयोजन.
  • विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत .
  • मूळ तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २० किमी अंतरावरून मुलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विक्रीकरिता नेणे अडचणीचे होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसे खर्च होऊ नये आणि जवळपास धान्याची विक्री व्हावी यासाठी राजोरी येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आधारभूत धान खरेदी केंद्राची निर्मिती केली.
  • ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरातील ७० टक्के जमीन कोरडवाहू स्वरूपाची आहे. त्यामुळे २५ गावातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्यासाठी मेंडकी परिसरातील सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
  • कोरोना संकट काळात खरीप हंगामपूर्व बैठक घेऊन ४ लाख ६८ हजार ९०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले.
  • बियाणे खते व कीटकनाशके पुरवठा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून दिले .
  • कोरोना संकटात शेती व शेती संलग्न आधारित उपक्रमांना विशेष खबरदारी.
  • कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात अधिक आर्थिक समृद्ध होता व्हावे यासाठी ” कॉटन क्लस्टर च्या विकासाला प्राधान्य “
  • मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील घोट येथे मका खरेदी केंद्र सुरु.
  • व्हिडीओ कॉन्फरन्सीग द्वारे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सोबत चर्चा करून विदर्भात युरिया खताचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून दिला.
  • कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबादची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे आदेश.
  • ज्या शेतकऱ्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना मासिक ५ हजार रुपये पेन्शन लागू करावी या मुळे माझ्या शेतकरी बांधवाना दिलासा मिळेल. अशी मागणी सभागृहात मांडली .
  • केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या द्वारे आयोजित ऍग्रो व्हिजन उपक्रमात सहभागी होऊन राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कोरोना काळात संबोधित केले .
  • शेतकऱ्यांना कर्जवाटप करतांना कागतपत्राचे कारण पुध्ये करून बोळवण न करण्याचे शकत आदेश दिले.
  • चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी कर्ज मिळावे, यासाठी वारंवार आढावा बैठक घेऊन ऐतिहासिक कर्ज वाटप जिल्ह्यात यशस्वी केली .
  • चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध वाहनाद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले.
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेता तात्काळ संबंधित विभागाला सूचना देत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध करून दिले.
  • युवा शेतकऱ्यांना शेती सोबतच जोड धंदा म्हणून पशुपालन सारखे संलग्न व्यवसाय करून आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून पशुधनावर आधारित शेळीपालन, कुकुटपालन, व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले.
  • शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम
  • रेकॉर्ड ब्रेक कापूस खरेदी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारे वर्ष .
  • चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने व रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांची महत्व लोकांपर्यंत पोहचता यावे यासाठी रानभाज्या महोत्सव आयोजित केले.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरांवर आलेल्या लॅम्पची आजाराला आळा घालण्यासाठी मोठया प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली .
  • मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण हंगामाचे नुकसान केले. पूर ओसरताच या भागाचा दौरा करून पाहणी केली.
  • नांदेड जिल्ह्यातील तूप गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे प्रत्येक्ष पाहणी केली .
  • लातूर जिल्ह्यातील सोनखेड ता. निलंगा येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
  • उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पीक विमा कंपनीने त्वरित पंचनामे करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्व्याबाबतची कार्यवाही वेगाने करण्यासाठी प्राधान्याने निर्देश दिले.
  • मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना संकटात मृत पावलेल्या कुटुंबांच्या सदस्यांना मदत वाटप
  • ओला दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना १०,००० कोटींची ऐतिहासिक मदत