पूर संकट काळात पूरग्रस्तांना मदतीचा हात

  • मध्यप्रदेश मधील भाजप सरकारने कोणतीही पूर्व सूचना न देता संजय सरोवर प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून ५ मीटर पर्यंत पाणी सोडले या मुळे आलेल्या पुरात पूर्व विदर्भातील हजारो कुटुंब बेघर झाले, हजारो संसार एका रात्रीत उध्वस्त झाले. आणि एक मोठे संकट उभे झाले होते.
  • या पुरात अत्यंत धोकादायक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी ताबडतोब NDRF ला निर्देश देऊन हेलिकॉप्टरच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलविले.
  • भीषम पुरस्थितीमुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला प्रशासन वेगाने कार्य करत होते, परंतु नैसर्गिक आपत्ती, सतत सुरु असलेला पाऊस, पुरामुळे बंद झालेले रस्ते या सर्वांमुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या सर्व नागरिकांना एका छताखाली ठेवण्यात आले होते.
  • संकटात नागरिकांचा आत्मविश्वास कोणत्याही स्थितीत कमी होऊ नये यासाठी कठीण प्रवास करून गावोगावी पोहचून पुरग्रस्तांसोबत संवाद साधला.
  • अत्यंत भीषम परिस्थिती असतांना हेलिकॉप्टरने पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
  • पूर विदर्भात पूरस्थिती असतांना प्रयत्नांची शिकस्त लावत कोणतेही प्राणहानी न होऊ देता हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले .
  • तांत्रिक कारणांमुळे जेथे प्रशासनाची मदत पोहचायला उशीर लागत होता तेथे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अन्न, चादर, पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.
  • पूरस्थिती ओसरल्यानंतर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात दौरा करून पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
  • स्वतःच्या ब्रम्हपुरी मतदारसंघासोबतच गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील काही गावे येथील दौरा केला.
  • प्रत्येक जागी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे मनाला वेदना देणाऱ्या होत्या.
  • मदत कार्यानंतर जबाबदारी होती ती पुनर्वसनाची संसार उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा संसार रुळावर आणण्याची त्यांना आधार देण्याची
  •  ३१ ऑगस्ट ला पूर आला २ सप्टेंबर २०२० ला प्राथमिक मदत जाहीर केली.
  • पूरग्रस्तांना १०,०००/- ची प्राथमिक मदत अन्न व कपड्यांसाठी थेट खात्यात उपलब्ध करून दिली.
  • नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना २०,००० /- रुपयांची मदत .
  • संकटाच्या वादळापासून आलेल्या अश्रुंचे पूर आणि मन हेलावून टाकणारे नुकसान यातून आपल्या विदर्भातील पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी १६२.८२ कोटी रुपये अशी भक्कम मदत सरकारकडून उपलब्ध करून दिली.
  •  कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भ पूर, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर, मुंबई मुसळधार पाऊस, महाड दुर्घटना, भिवंडी दुर्घटना या सर्व संकटात पूर्ण राज्याची जबाबदारी पार पाडतांना सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले नाही.